Monday, 28 May 2012

ओद्योगिक / Industrialओद्योगिक :-

अहमदनगर शहरातील ओद्योगिक वसाहतीमध्ये एकूण ९५० कंपन्या आहेत. त्यात प्रामुख्याने क्रोम्पटन, किर्लोस्कर, कायनेटिक, एल & टी, सन फार्मा, सह्याद्री, नगर फोर्जिंग, इंडियन सीमलेस या प्रमुख मोठ्या कंपन्या आहेत. दिवंगत नावातीत बार्शिकारांनी व्विरोधी पक्षात असतांना येथे ओद्योगिक वसाहत मंजूर करून आणली. येथे तयार होणाऱ्या वस्तूंना परदेशातूनही मागणी असते. तरीही ही वसाहत अविकासितच आहे.

एकूण ९५० पैकी निम्म्या कंपन्या बंद पडल्या आहेत.फोरकास कंपनी, मिस्त्री इंडस्ट्रीज, सुरज मोटर्स प्रा.लि., सुयश मेटल प्रा.लि., या कंपन्या तर आता अस्तित्वातच नाहीत. तर सह्याद्री इंडस्ट्रीज, राजा बहादूर मोती, अडॉन फोन्तेक्स, गरवारे नायलॉन, अडवाणी अरालीकोन, शिंगोटे प्रोसेस फूड, रालीवूलम, चाकण ओईल मिल, आदी कंपन्या बंद पडल्या आहेत. आय टी पार्क , फूड पार्क चे काम रखडले आहे. मध्यंतरी हिरो होंडा चा मोठा प्रकल्प नगरला येणार होता तोही रद्द झाला. येथील ओद्योगिक वसाहतीत टाटा नानो चे गिअर बनतात तर इंडियन सीमलेस चे सीमलेस ट्यूब तर जगांत फक्त ६ ठिकाणी तयर होतात त्यात नगर एक आहे

No comments:

Post a Comment