शहराविषयी थोडक्यात


शहराविषयी थोडक्यात


सन १४९० मध्ये स्थापन झालेली निजामशाही ही १४६ वर्षे टिकली. तिची स्थापनाच नगरला झाली होती. हीच निजामशाही १६३६ मध्ये संपुष्टात आली. अहमदनगर हे त्याकाळचे भारतातील एक सुप्रसिद्ध शहर होते. निजामानंतर अहमदनगर ने पेशवे, शिंदे आणि ब्रिटिशांची राजवट अनुभवली.
१८०३ साली अहमदनगर किल्ला हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आणि सन १८५४ ला अहमदनगर ला नगर परिषद स्थापन झाली. आणि २००३ ला महानगर पालिका.
२००१ सालच्या जनगणनेनुसार अहमदनगर शहराची लोकसंख्या पुढील प्रमाणे-
पुरुष :- १५९५६४
स्त्री: - १४८०५१
एकूण :- ३०७६१५.
अहमदनगर शहराचे क्षेत्रफळ ८४.८९ चौ. किमी असून शहरातील रस्त्यांची लांबी ३८५ किमी आहे.
अहमदनगर पासून काही निवडक शहरांचे अंतर:- मुंबई-२६० किमी, पुणे- १२० किमी, नाशिक- १७३ किमी, सोलापूर- २३० किमी, औरंगाबाद- ११५ किमी.
अहमदनगर शहरामध्ये खालील प्रमाणे चित्रपट गृहे आहेत:- शिवम, आशा, महेश, चित्रा इ.
अहमदनगर मधील महत्वाच्या लष्करी संस्था पुढीलप्रमाणे:- ACC&S, BTR, MIRC, VRDE, CQAV इ.
अहमदनगर मध्ये आता राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय बँका येत आहेत. वाहन उद्योगाची भरभराट होत आहे. विविध प्रकारच्या पात-पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. तसेच विस्तारणारी बाजारपेठ असल्याने अहमदनगर हे सोयीचे शहर आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post