बुऱ्हानगरची देवी / Burhanagar Goddess Temple

बुऱ्हानगरची देवी:-
कापूरवाडी तलावाकडे जात असतांना डाव्या बाजूला बुऱ्हानगर च्या देवीचे मंदिर दिसते. तुळजापूरच्या देवीचे हे जाज्वल्य ठाणे मानले जाते. सातवाहन काळातील राजा ‘संभूराय’ याला आपल्या राजधानीचा त्याग करावा लागला त्यानंतर तो अंबाबाईची मूर्ती व सिंहासन घेऊन जंगलात येऊन राहिला.सातवाहन घराण्यातील अखेरचा राजा भीम याचा सेनानी चाहु याने तेलप चालुक्याच्या मदतीने संभू रायाचा प्रभाव करून देवीची मूर्ती आपल्याबरोबर नेली अशी कथा सांगितली जाते.

नवरात्रोत्सवाच्या काळात तिसऱ्या मालेस येथे मोठी यात्रा भरते.देवीचा पलंग तुळजापूरला वाजत गाजत नेला जातो.ही परंपरा संत जनकोजी यांच्यापासून चालू आहे. देवीचे हे मंदिर सन १९१३ मध्ये लहानू भिकाजी भगत यांनी बांधले. अलीकडेच त्याचा जीर्णोद्धार झाला. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर तेलाचा घन आहे. समोर सिंहाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन भाविक आत जातात.जगदंबा मातेचीमुर्ती काळ्या शिळेची आहे. मिरवली पहाडावर जाणारा रस्ता बुऱ्हानगर वरूनच जातो. याचे बस स्थानकापासून चे अंतर ४.५ किमी आहे.

2/Post a Comment/Comments

  1. आता या जगदंबेच्या मंदिराच्या शिखराची शताब्दी महोत्सव आयोजित केला आहे ...सहस्त्रचंडी यज्ञ व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

    ReplyDelete
  2. आता या जगदंबेच्या मंदिराच्या शिखराची शताब्दी महोत्सव आयोजित केला आहे ...सहस्त्रचंडी यज्ञ व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

    ReplyDelete

Post a comment

Previous Post Next Post